स्फोटानंतर स्पेस एक्सचे रॉकेट नियंत्रणाबाहेर   

टेक्सास : स्पेस एक्सचे स्टारशिप रॉकेट नुकतेच अवकाशात झेपावले खरे मात्र, प्रक्षेपणादरम्यान एका पाठोपाठ स्फोट झाल्यामुळे उद्दिष्ट गाठण्यात अपयशी ठरले असून ते नियंत्रणाबाहेर गेले तसेच त्याचे दोन तुकडे झाले. 
 
दक्षिण टेक्सास येथील प्रक्षेपण स्थळावरुन सुमारे १२३ मीटर लांबीच्या रॉकेटची प्रक्षेपण चाचणी घेण्यात आली. त्याची ही नववी चाचणी होती. ती अपयशी ठरली आहे. रॉकेटच्या माध्यमातून स्टार लिंक प्रकल्पातील अनेक उपग्रह अवकाशात स्थिर करण्याची योजना होती. अर्ध्या जगाचा फेरा मारुन रॉके ट हिंद  महासागरावर आणून उपग्रह अवकाशात कक्षेत स्थिर करण्यात  येणार आहेत. मात्र, जेथून उपग्रह बाहेर पडणार आहेत त्याचे दरवाजे उघडले गेले नाहीत. प्रक्षेपणात वारंवार अपयश येत असल्यामुळे रॉकेटचे आधुनिकीकरण केले होतेे. त्यावर थर्मल प्लेट बसविल्या होत्या. पृष्ठभागाचे दोन भाग विशेष पद्धतीने जोडले होत. पण, आता रॉकेटमध्ये एका पाठोपाठ स्फोट झाले आणि ते नियंत्रणाबाहेर गेल्याने ते कुचकामी ठरले. आहे. 

अमेरिकेचे अब्जाधिश 

उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी आहे. अवकाश मोहिमात गेल्या काही वर्षात ती आघाडीवर आली आहे.

चंद्र, मंगळ ग्रह गाठण्याची योजना

स्टारशिप या बाहुबली रॉकेटचा वापर पुन्हा, पुन्हा करता यावा, अशी योजना स्पेस एक्सने आखली आहे. अशाच रॉकेटचा वापर करुन अवकाश यान चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची योजना आखली आहे. त्यात चार अवकाशवीर असतील. २०२७ मध्ये मोहीम राबविली जाणार आहे. त्यापैकी दोन अवकाशवीरांना पृथ्वीवर सुखरुप परत आणण्याची योजना आहे. चंद्रानंतर मंगळ ग्रहाचा प्रवास करण्याचा स्पेस एक्सचा विचार आहे. 
 

Related Articles